Faraaz Khan च्या मदतीला धावला Salman Khan; ICU मध्ये दाखल असलेल्या अभिनेत्याच्या ट्रिटमेंटचा सर्व खर्च करणार
Faraaz Khan and Salman Khan (Photo Credits: Instagram/ Facebook)

बॉलिवूड अभिनेता फराज खान (Faraaz Khan) याच्यासाठी सलमान खान (Salman Khan) याने मदतीचा हात पुढे केला आहे. फराज खान सध्या आयसीयू (ICU) मध्ये असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्याच्या हॉस्पिटल आणि ट्रिटमेंटचा संपूर्ण खर्च सलमान खान करणार आहे. अलिकडेच अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिने फराज खान याच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना मदतीची मागणी केली होती. त्यानंतर फराज खानच्या प्रकृतीविषयी चर्चा होऊ लागली. आता सलमान खान हॉस्पिटलचा खर्च करणार असल्याचे समोर आले आहे. (कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी Salman Khan ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले 'हे' 3 मंत्र केले शेअर)

प्राप्त माहितीनुसार, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मुळे त्रस्त असलेला फराज खान याच्यावर बंगळुरु येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फराज खान याची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याचा छोटा भाऊ फहमान खान पैसे जमा करत आहे. दरम्यान, फराज खान याला अभिनेता सलमान खान मदत करणार असल्याची माहिती अभिनेत्री कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर शेअर करत दिली.

Kashmera Shah Post:

कश्मीरा शाह हिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, "तुम्ही खऱ्या अर्थाने एक महान व्यक्ती आहात. फराज खान आणि त्यांच्या मेडिकल खर्चाचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. फरेब अभिनेता फराज खान याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला. तर इतरांनीही साथ दिली. मी नेहमीच त्यांची प्रशंसक होती आणि असेन. लोकांना ही पोस्ट आवडत नसेल तर मला फरक पडत नाही. त्यांच्याकडे मला अनफॉलो करण्याचा पर्याय आहे. सिनेसृष्टीत मला भेटलेला सर्वात खरा माणूस. मला हेच वाटत आले आहे आणि वाटत राहील." अशा शब्दांत कश्मीरा शाह हिने सलमान खान याचे कौतुक केले आहे. 'कहीं प्यार ना हो जाए' आणि 'दुल्हन हम ले जाएंगे' यांसारख्या सिनेमात कश्मीरा शाह ने सलमान खान सोबत काम केले आहे.