सलमान खान (Photo Credits: Instagram)

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोवा रुग्णांनी 68 लाखांचा आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा देशातील सर्व नागरिकांना कोरोनाबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी सण उत्सवाच्या काळात तसेच हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी मास्क घालावेत, हात स्वच्छ धुवावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेले 3 मंत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये सलमानने म्हटलं आहे की, 'भाऊ, बहिणी आणि मित्रांनो. या कठीण काळात फक्त तीन गोष्टी करा. 6 फूट अंतर राखा, मास्क घाला आणि आपले हात धुवा. पंतप्रधान मोदींच्या कोरोनाविरूद्धच्या जनआंदोलनाचे अनुसरण करित आहे. कॉमन इंडिया. जय हिंद.' (हेही वाचा -  Zee5 Show Churails Banned in Pakistan: बोल्ड कंटेंटमुळे पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आला झी 5 वरील प्रसिद्ध टीव्ही शो 'चुड़ैल्स')

सलमान खानच्या या ट्विटला लाखो लोकांना लाईक केलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सलमानने केलेलं आवाहन लोकांना आवडत आहे. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र होऊया. लक्षात ठेवा, नेहमी मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा, सामाजिक अंतर पाळा आणि दोन गजाचं अंतर ठेवा. असं केल्यास आपण यशस्वी होऊ आणि एकत्रितपणे कोरोना विरुद्धच्या लढाईत विजयी होऊ."

दरम्यान, सलमान खानच्या वक्रफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या सलमान कर्जतमध्ये आपल्या आगामी चित्रपट 'राधे'चं शुटिंग करत आहे. सलमानने दोन दिवसांपूर्वी चाहत्यांसाठी या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. सलमानने तब्बल 6 महिन्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे.