'दीवाना' स्टाइलमध्ये शाहरुख खान याची बाईकवरुन एन्ट्री, मात्र सचिन तेंडुलकर याने दिला काळजीचा सल्ला
शाहरुख खान आणि सचिन तेंडूलकर (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याने बॉलिवूडमध्ये नुकतीच 27 वर्षे पूर्ण केली आहेत. याच मुहूर्तावर शाहरुखने ट्वीट करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो त्याचा चित्रपट दीवाना मधील अंदाजात बाईकवरुन एन्ट्री करताना दिसून येत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियात लाखोंच्यावर नेटकऱ्यांनी पाहिले आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन याने आपली प्रतिक्रिया व्हिडियोसाठी दिली आहे.

सचिनने ट्वीट करत असे म्हटले आहे की, ''प्रिय बाजीगर, हेल्मेट घालणे विसरु नकोस. जब तक जान है तोपर्यंत बाईकवर असताना हेल्मेट घालणे कधीच विसरु नकोस. 27 वर्षे बॉलिवूडमध्ये पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. लवकरच भेटूया, मित्रा.''

तर बॉलिवूडमध्ये पदापर्णाची 27 वर्ष पूर्ण झाल्याने त्यासाठी शाहरुख याने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.सचिन याने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांकडून आनंद घेतला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सचिन याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सचिन एका कारमध्ये बसून बाईकस्वारांनी हेल्मेट घालण्याचे आवाहन देत होता.