ऋषी कपूर यांची बहिण रितू नंदा यांचे 71 व्या वर्षी निधन; कर्करोगाने होत्या त्रस्त
Ritu Nanda (Photo Credits: Instagram)

कपूर आणि नंदा कुटुंबातून एक दुःखदायक बातमी समोर येत आहे. ऋषी कपूर (Rishi Kapoor), रणधीर कपूर यांची बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा हिची सासू रितू नंदा (Ritu Nanda) यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिने आपल्या आत्याच्या निधनाची बातमी इंस्टाग्रामद्वारे मित्र आणि कुटुंबियांसह शेअर केली आहे. रितू नंदा या 71 वर्षांच्या होत्या. रितु नंदा या प्रसिद्ध विमा सल्लागार होत्या. तसेच त्या रितू नंदा विमा सेवा (RNIS) च्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

 

 

View this post on Instagram

 

To the kindest most gentle person I‘ve ever met - They don’t make them like you anymore - RIP bua #missyoualways🙏🏻

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

आपल्या आत्याच्या निधनाची बातमी शेअर करताना रिद्धिमा लिहिते, ‘To the kindest most gentle person I‘ve ever met - They don’t make them like you anymore - RIP bua #missyoualways.’ त्यानंतर या पोस्ट खाली अनेक दिगज्जांनी कमेंट्स करत दुःख व्यक्त केले आहे. ऑगस्ट 2019 मध्ये रितू नंदा यांचे पती राजन नंदा यांचे निधन झाले होते. रितू आणि राजन यांना दोन मुले आहेत. (अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात उद्भवली मोठी समस्या; बिग बींनी फोटो शेअर करत दिला इमोशनल मेसेज)

रितू नंदा या अभिनेता-दिग्दर्शक राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा यांच्या कन्या. त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1948 रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या कुटुंबातील अनेक लोकांनी चित्रपट सृष्टीमध्ये मोठे नाव कमावले आहे. अभिनेते पृथ्वीराज कपूर हे त्यांचे आजोबा, प्रेम नाथ आणि राजेंद्र नाथ हे त्यांचे मामा. अभिनेता प्रेम चोप्रा हे त्यांचे काका होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे चित्रपट अभिनेते त्यांचे भाऊ, त्यांना रीमा जैन नावाची एक बहीणही आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर त्यांच्या भाची, तर अभिनेता रणबीर कपूर त्यांचा भाचा आहे.