अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात हा काळा ठिपका कसला?; बिग बींनाही वाटली चिंता, तत्काळ घेतला डॉक्टरांचा सल्ला
अमिताभ बच्चन (Photo Credits: Facebook)

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून ढासळत चालली आहे. जेव्हा त्यांची तब्येत थोडी ठीक होते, तेव्हा लगेच ते काम करायला सुरुवात करतात. आता नुकतेच बच्चन साहेबांच्या डोळ्यांशी संबंधित बातमीमुळे चाहते चिंतित झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपल्या डोळ्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोद्वारे त्यांच्या डोळ्यात एक काळा ठिपका तयार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी डॉक्टरांचा सल्लाही घेतला आहे. मात्र डॉक्टरांनी, वयपरत्वे अशा गोष्टी उद्भवतील, यामध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही असे सांगितले आहे.

पहा अमिताभ बच्चन यांची पोस्ट -

ही बातमी शेअर करताना बच्चन साहेबांना त्यांच्या आईची आठवण झाली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात. ‘डावा डोळा फडफडू लागला, लहानपणी ऐकले होते की हे अशुभ असते. त्यानंतर डॉक्टरांना दाखवले तर वयपरत्वे उद्भवणारी गोष्ट आहे, काळजी करू नका असे ते म्हणाले. लहानपणी जर का आपला डोळा दुखला किंवा डोळ्याला काही इजा झाली, की आई आपल्या पदराचा बोळा करून डोळ्याला शेक द्यायची आणि सर्व ठीक व्हायचे. मात्र आई आता नाही, विजेच्या रुमालाचा शेक घेतला आहे, पण त्याला अर्थ नाही!! आईचा पदर तो आईचा पदर'

(हेही वाचा: चक्क OLX वर विक्रीला आहे अमिताभ बच्चन यांची मर्सिडीज कार; किंमत फक्त 9.99 लाख; जाणून घ्या इतर माहिती)

पहा अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या संक्रांतीच्या शुभेच्छा -

बिग बींची ही पोस्ट वाचून हे स्पष्ट होत आहे की, जीवनाच्या या टप्प्यावर स्वतःला सांभाळणे त्यांना मुश्कील होत आहे, परंतु ते प्रयत्न करीत आहेत. यासह त्यांनी अजून एक पोस्ट करत मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्येही त्यांनी संक्रांतीच्या (लोहरी) सणाची आपल्या आईसंदर्भात एक आठवण शेअर केली आहे.