Riteish Deshmukh रोज सकाळी उशिरा उठल्यावर काय खायला मिळते?, अभिनेत्याने सोशल मिडियावर शेअर केला खास व्हिडिओ
Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा देशमुख (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील क्युट कपल्सपैकी एक आहे. त्यामुळे सोशल मिडियावरही त्यांचे असंख्य चाहते आहे. आपल्या क्युट आणि मजेशीर व्हिडिओजनी ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. तसेच त्यांच्यातील पती-पत्नीपेक्षा दृढ असलेल्या मैत्रीच्या नात्याची झलक देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्यांचे व्हिडिओज सोशल मिडियावर देखील खूप व्हायरल होत असतात. नुकताच रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने रोज सकाळी उशिरा उठवल्यावर काय खायला मिळते याबाबत सांगितले आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश ज्यूस पिताना दिसत आहे. यात रिलच्या व्हिडिओमध्ये रोज सकाळी उशिरा उठल्यावर त्याला काय खायला मिळते असा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर ऐकून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. हेदेखील वाचा- रितेश देशमुख ने लग्नापूर्वी जेनेलिया ला पाठवलेल्या 'त्या' मेसेजमुळे त्यांचे नाते येणार होते संपुष्टात, कपिल शर्माच्या शो मध्ये पत्नीने सांगितला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या प्रश्नाचे उत्तर रितेशने 'चप्पल' असे दिले आहे. हा रिलचा एक मजेशीर व्हिडिओ असून चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला कमेंट्स केल्या आहेत.

याआधीही रितेशने आपले अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर रितेश आणि जेनेलियाचे टिकटॉक व्हिडिओही प्रचंड लोकप्रिय आणि तितकेच व्हायरल झाले होते. दरम्यान त्याने आपल्या वडिलांच्या कपड्यांसोबत केलेल्या व्हिडिओने तर अनेकांना भावूकही केले.

दरम्यान, रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ केदारनाथ मंदिराचा (Kedarnath Temple) असून त्यातील दृश्यं विलोभनीय आहे. "Kedarnath Temple!! Breathtakingly beautiful"  असं म्हणत रितेश देशमुख याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत #omnamahshivay हा हॅशटॅगही जोडला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमागे वाजणारी आरती यामुळे सुरेख वातावरण निर्मिती झाली आहे. आभाळ भरुन आल्याने आकाश काळसर निळं दिसत आहे. धुकं अगदी मंदिराच्या कळसापाशी दाटलं आहे