Saroj Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडच्या लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan) यांचे आज मुंबईत (Mumbai) निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे संपूर्ण बॉलिवूडकरांवर शोककळा पसरली असून राजकीय स्तरातूनही दुःख व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अनेकजण सोशल मीडिया माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी देखील ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), आमदार रोहित पवार (Rohit Pawar), भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांसारख्या राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून सरोज खान यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. (नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने रेमो डिसूजा, फराह खान, अक्षय कुमार, जेनेलिया देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली!)

प्रकाश जावडेकर:

रोहित पवार:

अनिल देशमुख:

विनोद तावडे:

सुप्रिया सुळे:

जून 20 रोजी सरोज खान यांना वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्र्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर आज सकाळी कार्टिअक अरेस्टमुळे सरोज खान यांचे निधन झाले.  सरोज खान यांनी आपल्या नृत्यदिग्दर्शनाने बॉलिवूडमधील अनेक स्टार्संना आपल्या तालावर नाचवले आहे.