RIP Saroj Khan: नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनाने रेमो डिसूजा, फराह खान, अक्षय कुमार, जेनेलिया देशमुख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली!
Saroj Khan, Remo D'souza, Farah Khan, Akshay Kumar, Genelia Deshmukh (Photo Credits: Twitter)

आपल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराने अवघ्या बॉलिवूडला आपल्या तालावर ठेका धरायला लावणा-या ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (Choreographer Saroj Khan) यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड जगतावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरोज खान यांनी न केवळ नृत्यदिग्दर्शन केले तर त्यांच्या हाताखाली रेमो डिसूजा (Remo D'Souza), गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांसारखे उत्तम नृत्यदिग्दर्शक तयार केले. जितक्या प्रेमळ तितक्याच वेळप्रसंगी कलाकाराला खडे बोलावून सुनावून नृत्याची बाराखडी शिकवणा-या सरोज खान यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड कोलमडून गेला आहे. मास्टरजी सरोज खान यांच्या जाण्याने नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजा, फराह खान (Farah Khan), अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), जेनेलिया डिसूजा (Genelia Deshmukh) यांनी ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत "सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दु:ख झाले. सरोज खान स्वत:मध्ये एक इन्स्टिट्यूट होत्या. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, त्यांच्यासोबत काम करण्यात आणि खुद्द त्यांना डायरेक्ट करण्याची संधी मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो."

तर नृत्यदिग्दर्शिका फराह खान, अभिनेता खिलाडी अक्षय कुमार यांनीही ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

हेदेखील वाचा- Saroj Khan Funeral: सरोज खान यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी रवाना, शोकसागरात बुडाले संपूर्ण बॉलिवूड

त्याचबरोबर अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख हिने आपल्याला सरोज खान सोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असे ट्विट केले आहे.

सरोज खान यांच्या पश्चात त्यांचे पती बी.सोहनलाल, मुलगा हामिद आणि हिना आणि सुकन्या असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.