Salman Khan, Remo D'souza & Lizelle D'Souza (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'Souza) काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी परतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्याच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. रेमो ख्रिसमसचा सण देखील आपले नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींसह साजरा केला. दरम्यान, रेमोची पत्नी लिजेल डिसुझा  (Lizelle D'Souza) ने रेमो सोबतचा सुंदर फोटो शेअर करत भावूक संदेश लिहिला आहे. यात तिने कठीण काळात साथ दिल्याबद्दल सलमान खानचे आभारही मानले आहेत.

लिजेल डिसूजाने एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, "माझे आतापर्यंतचे सर्वांत छान ख्रिसमसचे गिफ्ट. हा क्षण मी कायम माझ्या हृदयाजवळ ठेवेन. प्रत्येक आठवड्यातील सर्वात वाईट भावनिक चढ-उतारांनंतर असे मिठीत घेणे. मला माहित आहे की मी सुपरवूमन आहे. पण मला अचानक वाटले की, मी एक लहान मुल गमावले आहे. तु फायटर आहेस आणि तू तसाच परत येशील, या एका गोष्टीसाठी माझा तुझ्यावर आणि देवावर विश्वास होता." (Remo D'Souza Discharged from Hospital: रुग्णालयातून बरा होऊन रेमो डिसूजा परतला घरी, कुटूंबाने केले खास अंदाजात स्वागत)

Lizelle D'Souza Post:

 

View this post on Instagram

 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

पुढे तिने लिहिले की, "कोकिलाबेन मधील सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते. त्यांनी 48 तासांत कधीच मला एकटीला सोडले नाही." त्याचबरोबर तिने अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहेत. "कठीण काळात माझा आधार झाल्याबद्दल धन्यवाद. तू मला भावनिक आधार दिल्यास तू माझा एंजल आहेस," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, रेमो डिसूजाने सलमान खानच्या रेस 3 सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. याशिवाय रेमोने 'फ्लाइंग जट', 'फालतू', 'एबीसीडी', 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डांसर' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर डान्स प्लस शो मध्ये रेमो ने जज म्हणूनही आपली विशेष ओळख सोडली आहे.