बलम पिचकारी, बत्तमीज दिल, राधा तेरी चुनरी यांसारखी एकाहून एक हिट गाणी देणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा (Choreographer Remo D'Souza) अखेर रुग्णालयातून बरा होऊन आता घरी परतला आहे. काही दिवसांपूर्वी त्या हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा झाला आहे. त्यामुळे त्याला काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रेमोला डिस्चार्ज मिळाल्याचे ऐकून त्याचे चाहते जितके आनंदित आहे तितकेच त्याचे कुटूंबिय सुद्धा. म्हणून रेमो घरी परतल्यावर त्याच्या कुटूंबाने खास अंदाजात रेमोचे स्वागत केले.
रेमोच्या मुलांनी आणि त्याच्या कुटूंबाने घरात फुगे लावले होते. ज्यावर वेलकम बॅक असे लिहिले आहे. हे फुगे रेमोने हातात घेतले असून गोड हसत त्यांनी घरच्यांचे तसेच तमाम चाहत्यांचे आभार मानले आहे.हेदेखील वाचा- Remo D'souza Health Update: रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याची पत्नी लिझेलने दिली 'अशी' माहिती
View this post on Instagram
या पोस्टखाली रेमो ने 'तुमचे प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादामुळे मी परत आलो आहे. मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे.' रेमोच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रेमोला बरा झालेला पाहून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
रेमोने आतापर्यंत अनेक बड्या बॅनरचे चित्रपट केले आहेत. त्याने 2000 साली 'दिल पे मत ले यार' या चित्रपटातून कोरिओग्राफर म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
रेमो न केवळ एक उत्तम कोरिओग्राफर आहे तर एक माणूस म्हणूनही खूप जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्ट्रगलर कलाकारांचे करियर घडवले आहे. त्यात धर्मेश, पुनीत ही नाव आर्वजून समोर येतात. कोरियोग्राफर धर्मेश सर त्यांना आपला देव मानतो.