Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात; तीन दिवस चालणार लग्नाचे कार्यक्रम
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter

आतापर्यंत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding) अनेक अटकळ बांधल्या जात होत्या. पण आता त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, हे जोडपे 15 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे. आलियाचे काका रॉबिन हे बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक आहेत आणि महेश भट्ट यांचे सावत्र भाऊ आहेत. न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे आणि लग्नाचे कार्यक्रम चार दिवस चालणार आहेत.

आलिया भट्टच्या काकांनी दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, त्यांना लग्नाचे आमंत्रणही मिळाले आहे. त्यानुसार बॉलीवूडचे ‘पॉवर कपल’  पुढील आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया-रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर दोघांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

रणबीर-आलिया यांच्या 15 एप्रिल होणाऱ्या लग्नाआधी दोन दिवसापासून दोघांच्याही घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून फोटो लीक होऊ नये. लग्नानंतर रणबीर-आलियाचे रिसेप्शन सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह चेंबूरच्या 'आरके हाऊस' या वडिलोपार्जित घरी होणार आहे. (हेही वाचा: Sonam Kapoor ने नुकताच केला Hot फोटोशूट Baby Bump Flaunt करतांना दिसून आली, पाहा फोटो)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मेहंदी सोहळा 13 एप्रिलला होणार आहे. आलियाच्या वांद्रे (वास्तू) येथील घरी मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. 14 हळद/संगीत असेल व 15 तारखेला रात्री आरके हाऊसमध्ये लग्न होणार आहे. बॉलीवूडसाठी होणाऱ्या ग्रँड रिसेप्शनची तारीख अद्याप समोर आली नाही.