Raj Kundra ने पत्नी Shilpa Shetty चे काहीही न ऐकता आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत केले 'हे' धक्कादायक खुलासे
Raj Kundra (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) हे बॉलिवूडमधील क्युट जोडप्यांमधील एक जोड जोडपं आहे. मात्र सध्या यांच्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडली आहे, ज्यामुळे हे दोघेही खूप अस्वस्थ आहेत. राज कुंद्राची एक्स पत्नी कविताने (Kavita) असा गंभीर आरोप लावला होता की, शिल्पाने आपलं घर तोडल्याचा आरोप लावला होता. तो जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अशातच राज कुंद्राने आपल्या भूतकाळाबाबत आणि कविताबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राजने आपल्या माजी पत्नीबाबत कविताबाबत धक्कादायक खुलासा करत तिने आपल्याला धोका दिल्याचे सांगितले आहे.

राजने सांगितले की, शिल्पा मला ही मुलाखत देऊ नको असे वारंवार सांगत होती. मात्र आपण हे करणारच हे राजने निश्चित केले होते. राजची पूर्वाश्रमीची पत्नी कविता हिचे राजच्या भावोजींसोबत विवाहबाह्य संबंध होते. पहिल्यांदा त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही मात्र हळूहळू जशी ही गोष्ट समोर आली आणि घरातील लोक याबाबत चर्चा करु लागले तेव्हा त्याचा विश्वास बसला.हेदेखील वाचा- Shilpa Shetty ने आपले संपूर्ण घर केले सॅनिटाइज; अभिनेत्री वगळता संपूर्ण कुटुंबाला झाली होती कोरोना विषाणूची लागण

राजच्या आईने अनेकदा कविता आणि त्यांच्या जावयाला रंगेहाथ पकडले होते. जेव्हा मला याबाबत कळाले जेव्हा पुर्णपणे कोलमडलो आणि मी तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राजने कविताला अनेकदा संधी देखील दिली पण त्याच्या भावोजींसोबत संपर्कात होती. शेवटी राजने कविता आणि आपल्या 40 दिवसाच्या मुलीला दूर केले. राजने सांगितले की आपल्या मुलीला सोडणे माझ्यासाठी खूप कठिण होतं. तिची कस्टडी मिळविण्यासाठी आपण कोर्टात लढलो सुद्धा. मात्र मुलीचे वय पाहता तिची कस्टडी तिच्या आईला मिळाली. मात्र आजही तो त्याच्या मुलीची वाट पाहत आहे.

तसेच कविताने म्हटल्याप्रमाणे शिल्पाने तिचे घर कधीत तोडले नव्हते. शिल्पाशी राजची ओळख कविताशी वेगळं झाल्यानंतर झाली होती. जशी राज आणि शिल्पाच्या रिलेशनशिपबाबत बातम्या समोर आल्या तेव्हा कविताने घटस्फोटादरम्यान पोटगीची रक्कम आणखी वाढवली. या मुलाखतीनंतर राज कुंद्रा यांना मन खूप हलके झाल्यासारखे वाटत आहे.