Shilpa Shetty Home (PC - Instagram)

कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीय संसर्गाचा बळी ठरले आहेत. आतापर्यंत अनेक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना साथीचा बळी गेला आहे. अलीकडेचं बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटूंबालाही कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर तिचे संपूर्ण कुटुंब आता बरे झाले आहे. शिल्पा शेट्टी यांच्या कुटुंबियांनी कोरोनावर मात केली आहे. अभिनेत्रीचा पती राज कुंद्रा, दोन्ही मुले वियान आणि समीषा आणि इतर सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हला आली होती. त्याच्या कुटुंबासाठी हा कठीण वेळ होता. शिल्पा शेट्टीने वेळोवेळी सोशल मीडियावरील चाहत्यांना आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यविषयक अपडेट दिले. आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपले घर सॅनिटाइज केलं आहे.

शिल्पा शेट्टी यांनी हा व्हिडीओ तिच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये घराच्या सॅनिटायजेशनची प्रक्रिया केली जात आहे. व्हिडिओमध्ये दोन लोक घराची स्वच्छता करताना दिसत आहेत. (वाचा - Sapna Choudhary: स्टेजवर आग लावणाऱ्या सपना चौधरीचा घरात केलेला जबरदस्त डान्स बघितलात का? पाहा संपूर्ण व्हिडिओ)

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिल्पा शेट्टी यांनी लिहिले आहे की, 'कोविडमधून बरे झाल्यानंतर स्वच्छता.' तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे बरेच चाहते आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Updates (@ismart.updates)

शिल्पाने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सांगितले होते की, 'एक कुटुंब म्हणून गेल्या 10 दिवस आमच्यासाठी खूप त्रासदायक होते. माझ्या सासू-सासऱ्यांची कोविड चाचणी सकारात्मक आली. यानंतर, समीशा, वियान-राज, माझी आई आणि शेवटी राज यांना संसर्ग झाला. शासकीय मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सर्व घरात क्वारंटाईन आहेत.'