सलमान खानच्या 'राधे' या बहुप्रतिक्षित सिनेमामधील पहिलं गाणं 'सीटी मार' (Radhe Song Seeti Maar) आज (26 एप्रिल) रीलिज करण्यात आले आहे. सलमान खान (Salman Khan) सोबत अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) या गाण्यांत थिरकत आहे. सलमान खानने ट्वीट करत 'सीटी मार' हे पहिलं गाणं शेअर करताना अभिनेता अल्लू अर्जुनचे आभार मानले आहेत. अल्लू अर्जून (Allu Arjun) ज्या अंदाजात या मूळ गाण्यावर थिरकला आहे त्याचे देखील सलमान खानने कौतुक करत आता राधे सिनेमात स्वतःच्या अंदाजात सलमान खानने हे गाणं पुन्हा बनवलं आहे.
राधे सिनेमातील सीटी मार हे गाणं शब्बीर अहमद(Shabbir Ahmed)ने लिहलं असून कमाल खान (Kamal Khan) आणि लुलिया व्हेंतूर (Lulia Vantur)यांनी गायलं आहे. Radhe: Your Most Wanted Bhai Trailer: बहुप्रतिक्षित 'राधे' सिनेमाचा ट्रेलर आऊट; अॅक्शन थ्रिलर सिनेमात पहा Salman Khan चा दमदार अंदाज (Watch Video).
सीटी मारची झलक
Thank u Allu arjun for seeti maar absolutely loved the way u have performed in the song, the way u dance, your style, u r simply fantastic.. tk care n b safe. Rgds to ur family .. love u brother @alluarjun#SeetiMaar https://t.co/St8cWOmNKX
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 26, 2021
सीटी मार मध्ये सलमान ब्लॅक टी शर्ट आणि लाल ब्लेझर मध्ये दिसत आहे. तर दिशा पांढरा टॉप आणि बॅगी डेनिम मध्ये डॅझलिंग अंदाजात आहे.
काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या निर्मात्यांकडून ट्रेलर प्रसिद्ध करण्यात अला होता. गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची पटकथा बेतलेली आहे. सलमान पुन्हा अॅक्शनपट अंदाजामध्ये या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊन मुळे यंदा हा सिनेमा थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ओटीटी वर प्रदर्शित होणारा राधे हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे 13 मे ला ईदच्या पार्श्वभूमीवर आता हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी पूर्ण सज्ज आहे.