Radhe: Your Most Wanted Bhai Trailer: बहुप्रतिक्षित 'राधे' सिनेमाचा ट्रेलर आऊट;  अॅक्शन थ्रिलर सिनेमात पहा Salman Khan चा दमदार अंदाज (Watch Video)
Radhe: Your Most Wanted Bhai Trailer out (Photo Credits: Youtube)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) आज लॉन्च झाला आहे. मागील वर्षी रिलीज होणारा हा सिनेमा कोरोना व्हायरस संकटामुळे लांबणीवर पडला होता. अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर रिलीज होताच अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. या सिनेमातही चाहत्यांना सल्लू स्टाईल, त्याची विशेष डायलॉगबाजी, डान्स पाहायाला मिळणार आहे, असे ट्रेलरवरुन दिसून येते.

राधे सिनेमात सलमान खान पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत असून मुंबईतील ड्रग्स माफियांना हाताळण्याचे काम त्याला सोपवण्यात येते. त्यानंतर 'I Will Clean The City'  म्हणत त्याच्या शैलीत तो ड्रग्स माफिया, वाढलेला क्राईम रेट याचा कसा बंदोबस्त करतो, याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे सिनेमात कधीच किसिंग सीन न देणाऱ्या सलमान ने राधे सिनेमात त्याची परंपरा मोडली आहे का? असा प्रश्न ट्रेलर पाहिल्यावर चाहत्यांना पडणार आहे. दरम्यान,  रणदीप हुड्डा यात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Salman Khan Tweet:

पहा ट्रेलर:

(Radhe Release: 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्म सह थिएटरमध्ये होणार प्रदर्शित)

या सिनेमात सलमान खान शिवाय दिशा पटानी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, मेघा आकाश, सुधीर बाबू, चंकी पांडे, सुनील ग्रोवर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॅकलिन फर्नांडिस ची सिनेमात विशेष उपस्थिती पाहायला मिळणार आहे. सलमान खान फिल्म्स आणि रिल लाईफ प्रा. लि. यांनी एकत्रितपणे हा सिनेमा निर्मित केला असून प्रभू देवा ने दिग्दर्शन केले आहे. ईदच्या मुहुर्तावर 13 मे रोजी हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.