
Promotion of Illegal Betting Apps: सायबराबादमधील मियापूर पोलिस ठाण्यात दक्षिणेतील कलाकार राणा दग्गुबती (Rana Daggubati), प्रकाश राज (Prakash Raj), मंचू लक्ष्मी (Manchu Laxmi) आणि निधी अग्रवाल (Nidhi Agarwal) यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन (Promotion of Illegal Betting Apps) दिल्याच्या आरोपाखाली या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांनी या 25 प्रसिद्ध कलाकारांवर कारवाई केली आहे. 17 मार्च रोजी, हैदराबादच्या पश्चिम विभाग पोलिसांनी इंटरनेटवर बेटिंग अॅप्सचा बेकायदेशीरपणे प्रचार केल्याबद्दल तीन महिलांसह 11 सोशल मीडिया प्रभावकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.
दक्षिणेतील स्टार्सविरुद्ध एफआयआर दाखल -
दरम्यान, 32 वर्षीय व्यापारी पीएम फणींद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून हैदराबादमधील मियापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की, हे प्लॅटफॉर्म जुगार कायदे आणि नियमांचे थेट उल्लंघन करत होते. ज्यामुळे समाजातील लोकांचे मोठे नुकसान होते. (हेही वाचा - The Family Star मधील 'त्या' डायलॉगमुळे Vijay Deverakonda होतोय ट्रोल, (Watch Video))
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बेटिंग प्लॅटफॉर्म विशेषतः तरुण व्यावसायिकांना आणि सामान्य लोकांना लक्ष्य करतात जे सहजपणे जुगार खेळू इच्छितात. हे लोक बेरोजगार तरुणांना बेटिंग अॅप्सद्वारे भरपूर पैसे कमवू शकतात असे सांगून खोट्या आशा देत आहेत. कोणीही बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार करू नये. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, इम्रान खान नावाचा एक युट्यूबर अनैतिक, अश्लील व्हिडिओ बनवत होता. तो त्याच्या व्हिडिओंसाठी लहान मुलांचाही वापर करत आहे. आम्ही इम्रानसारख्या लोकांवर पाळत वाढवली आहे. तरुणांना दिशाभूल करणाऱ्या बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू. बेकायदेशीर बेटिंग अॅप्स प्रकरणात या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Liger Trailer Out: विजय देवरकोंडाचा जबरदस्त Actionने भरलेला 'लायगर'चा ट्रेलर रिलीज)
हैदराबाद पोलिसांनी 'या' कलाकारांवर केली कडक कारवाई -
दरम्यान, तक्रारदाराच्या तक्रारीवरून 11 प्रभावशाली लोकांविरुद्ध कलम 318 (4) बीएनएस, 3, 3अ, 4 गेमिंग अॅक्ट आणि कलम 66ड आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा, इम्रान खान यांच्या व्यतिरिक्त विष्णू प्रिया, हर्ष साई, श्यामला, टेस्टी तेजा, रितू चौधरी, बंडारू शेषयानी सुप्रीता, किरण गौड, अजय, सनी, सुधीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.