Priyanka Chopra-Jonas चा नवा विक्रम; ठरली 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही विशेष स्थान निर्माण केले आहे. तिने मॉडेलिंग, अभिनय आणि गायनाच्या जगात स्वत:ची ओळख निर्माण केली. आता प्रियांकाने आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. प्रियंका चोप्रा 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जागतिक मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारी प्रियंका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रियंका अल्युअर, मेरी क्लेअर, एल, वोग, मॅक्सिम, इनस्टाइल, कॉस्मोपॉलिटन आणि कॉम्प्लेक्स सारख्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये झळकली आहे.

2021 च्या शेवटी 'मोस्ट अॅडमायर्ड वुमन-2021' ची यादी झाली झाली, ज्यामध्ये जगभरातील अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे यामध्ये प्रियंकाला स्थान देण्यात आले होते. टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवणारी प्रियंका ही एकमेव भारतीय अभिनेत्री होती. गेल्या वर्षी अभिनेत्री या यादीत 15 व्या क्रमांकावर होती.

दरम्यान, मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रियंका चोप्रा पॅरिसमध्ये प्रतिष्ठीत ग्लोबल सिटीझन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंचालन केले होते. यावेळच्या तिच्या पृथ्वी थीम असलेल्या पोशाखाची बरीच चर्चा झाली होती. (हेही वाचा: Allu Arjun: इंस्टाग्रामवर 15 मिलियन फॉलोअर्ससह अल्लू अर्जुन बनला साऊथचा पहिला सुपरस्टार)

नुकतेच प्रियंका 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'द मॅट्रिक्स रिअॅक्शन्स' या हॉलिवूड चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिने सतीची भूमिका साकारली होती. 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन'मध्ये जुन्या चित्रपटांतील अनेक पात्रे घेण्यात आली आहेत, तर काही नवीन पात्रेही जोडण्यात आली आहेत. ती लवकरच Amazon Prime Video च्या Citadel आणि अमेरिकन रोमँटिक ड्रामा सिरीज Text for You मध्ये दिसणार आहे.