बॉलिवूड अभिनेता गोविंदा ह्याच्या गाण्यावर थिरकला निक जोनस, प्रियांका चोप्रा कडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
प्रियंका चोप्रा (Photo Credits : Instagram)

सध्या बॉलिवूड कलाकार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) ह्यांच्या बद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगत आहेत. तसेच या दोघांच्या घटस्फोटाबद्दल ही काही दिवसांपूर्वी बोलले जात होते. मात्र प्रियांका आणि निक यांच्या वागण्याबोलण्यातून दोघांमध्ये घटस्फोट होईल असे दिसूनच येत नाही आहे. उलट प्रियांका आणि निक दोघे खुप उत्साही आणि एकमेकांसोबत खुश असल्याचे दिसत आहे. त्यातच आता प्रियांका हिने पती निक जोनस ह्याचा बॉलिवूड कलाकार गोविंदा (Govinda) ह्याचे 'मेरी पँन्ट भी सेक्सी' गाण्यावर जबरदस्त थिरकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

सोशल मीडियावर निकचा गोविंदाच्या गाण्यावरील मीम्स व्हिडिओ व्हायरल झाला. तर प्रियांकानेसुद्धा हा व्हिडिओ पाहून तिला हसू अनावर झाल्यामुळेच तिनेसुद्धा या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या गाण्यात निक निळ्या रंगाच्या सूट मध्ये दिसून येत असून गोविंदाच्या गाण्याला सूट होईल अशा पद्धतीने निक डान्स करताना दिसून येत आहे.(हेही वाचा-पार्टीमध्ये निक जोनस-प्रियांका चोप्रा यांची धमाल मस्ती, चाहत्यांवर केक फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)

 

View this post on Instagram

 

R U 🆒?? 🙌🏽 tonight! @jonasbrothers @nickjonas @joejonas @kevinjonas ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

तर निक जोनस ह्याच्या नावाने मीम्स म्हणून बनवण्यात आलेला हा व्हिडिओ खरेतर निकचे 'कूल' नावाच्या गाण्यावर बनवला आहे. ज्याचे गोविंदाच्या गाण्यावरुन मॅशअप करण्यात आला आहे. तर काही दिवसांपू्र्वीच जोनस ब्रदर्स यांचे 'सकर' नावाचे गाणे लॉन्च करण्यात आले होते. या गाण्यात निक-प्रियांका एकत्र दिसून आले आहेत.