Blenders Pride या मद्याच्या ब्रँड च्या जाहिरातीमुळे प्रियंका चोप्रा सोशल मीडियात ट्रोल (Video)
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram/@team_pc)

बॉलिवडूची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियात चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती शेअर करत असलेल्या फोटोज, व्हिडिओजमुळे ती अनेकदा ट्रोल होते. तर कधी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडतो. मात्र नकारात्मक कमेंट्सकडे फारसे लक्ष न देता प्रियंका सातत्याने पोस्ट करत असते. अलिकडेच प्रियंका ब्लेंडर्स प्राईड (Blenders Pride) या मद्याच्या ब्रॅण्डची जाहिरातीत झळकली. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर देखील केला. मात्र त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या अनेक भन्नाट प्रश्नांना आणि प्रतिक्रीयांना सामोरे जावे लागत आहे.

मद्यप्राशनामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यातच जर प्रियंका अस्थमा पेशन्ट आहे. तर तिने अशा जाहिराती करु नये, असे म्हणत नेटकऱ्यांनी प्रियंकाला ट्रोल केले आहे. तसंच "आता तुझा अस्थमा कुठे गेला? भारतात आल्यावरच फक्त तो जाणवतो का?" अशा प्रश्नांचा भडीमार त्या व्हिडिओवर केला जात आहे. ('प्रियंका चोप्रा'ने निक जोनस सह शेअर केलेले रोमँटीक फोटोज व्हायरल; प्रियंकाचा बोल्ड लूक ठरला लक्षवेधी)

प्रियंका चोप्राची ब्लेंडर्स प्राईड ची जाहिरात:

यापूर्वी प्रियंकाचा पती निक जोनाससह सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा देखील नेटकऱ्यांनी प्रियंकाला चांगलेच ट्रोल केले होते.