बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन सिंगर निक जोनस (Nick Jonas) हे 1 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने आणि 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर दिल्लीत प्रियंका-निकच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन झाले. या रिसेप्शनला अनेक दिग्गजांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Prime Minister Narendra Modi) उपस्थित होते. लग्नाला काही दिवस होताच प्रियंकाने सोशल मीडियावर नावात बदल केल्याचे दिसून आले. प्रियंकाने आता आपले नाव प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) असे ठेवले आहे. पाहा व्हिडिओ: प्रियांका-सोफीची फुगडी सोशल मीडियात व्हायरल
प्रियंकाने सोशल साईट्सवर हे नाव बदले असले तरी ट्विटर आणि फेसबुकवर नावात बदल केलेला दिसत नाही. इंस्टाग्रामवर (Instagram) मात्र नावातील बदल पाहायला मिळत आहे.
प्रियंका च्रोपा इंस्टाग्राम (Photo Credits: Instagram)
जोधपूरमध्ये रंगलेल्या विवाहसोहळ्याचे आणि त्यानंतर दिल्लीतील ग्रँड रिसेप्शनचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र चाहत्यांना प्रियंका-निकच्या मुंबईतील रिसेप्शनच्या फोटोजची उत्सुकता आहे.