PM Modi Biopic (Photo Credits-Twitter)

PM Modi Biopic: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांचा येणारा बायोपिक पीएम मोदी येत्या 5 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस (Congress) पक्षाने चित्रपट प्रदर्शित करण्यात येणाऱ्या तारखेवर आक्षेप घेतला असून त्यांनी यासाठी निवडणुक आयोगाकडे (Election Commission) धाव घेतली आहे.

काँग्रेस पक्षाने आरोप लगावला आहे की, मतदानच्या पहिल्या टप्प्यापूर्वी मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित झाल्यास सर्व मतदार त्यांची बाजू किती योग्य आहे असे समजून त्यांना साथ देतील. त्यामुळे चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येऊ नये असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. तसेच ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट यापूर्वी 11 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र त्यानंतर त्याची प्रदर्शित करण्याची तारीख बदलण्यात आल्यानंतर 5 एप्रिल रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.(हेही वाचा-PM Narendra Modi Song : पीएम नरेंद्र मोदी चित्रपटातील देशभक्तीने भारलेले गीत प्रदर्शित पहा व्हिडीओ)

तर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता भाजप पक्षाचे असल्याने पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर याचा फायदा घेतला जाऊ शकतो. तसेच कपिल सिब्बल, आरपीएन सिंह आणि अभिषेक मनु संघवी यांनी मोदी यांचा हा चित्रपचट संविधानाच्या भावनांचे उल्लंघन करत असल्याचे निवडणुक आयोगामध्ये सांगितले आहे.