पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बायोपिक पीएम मोदी (PM Modi Biopic) येत्या 5 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याने विरोधकांकडून या चित्रपटासाठी विरोध केला जात आहे. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये ही मागणी काँग्रेस (Congress) पक्षाकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) प्रमुख सतीश गायकवाड यांनी मुंबई हायकोर्टात चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखेवरुन याचिका दाखल केली होती. पीएम मोदी या चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नंतर आता भीम सेनेकडून (Bhim Army) चित्रपटाच्या प्रदर्शित करण्याच्या तारखेवरुन विरोध केला जात आहे. यासाठी भीम सेनेकडून अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी चित्रपट प्रदर्शित केल्यास मोदी यांना अधिक मतदान केले जाईल असे भीम सेनेसे म्हटले आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार घडल्यास निष्पक्ष मतदान होणार नाही.(हेही वाचा-PM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव)
तर मुंबई हायकोर्टात गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचार संहितेचे उल्लंघन करण्यासारखे आहे. तसेच या चित्रपटामुळे मतदान हे अधिकाधिक मोदी यांच्या बाजूने केले जाण्याची शक्यता असल्याचे ही यामध्ये म्हटले आहे.