Close
Search

Padma Shri Award 2020: जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

जेष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award 2020) जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मनाचे नागरी सन्मान असलेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे.

बॉलिवूड Ashwjeet Jagtap|
Padma Shri Award 2020: जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Suresh Wadkar (Photo Credit: Twitter)

जेष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award 2020) जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मनाचे नागरी सन्मान असलेल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी आनंद व्यक्त केला. तसेच गायन कोकीळा लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे कौतूकही केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या संगीत कारकर्दीत लतादीदी आणि आशा दीदींचा आशीर्वाद असल्याची कृतज्ञ भावना वाडकर यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हेतर लतादीदी यांच्यासारखे थोडे तरी गाता आले तर स्वत:ला भाग्यवान समजेल असेही ते म्हणाले आहेत.

सुरेश वाडेकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचं शिक्षण सुरु केले. सुरेश वाडेकर यांचा विवाह 1988 मध्ये पद्मा यांच्याशी झाला. पद्मा वाडकरही प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. सुरेश वाडकरांनी हिंदी आणि मराठीसह भोजपुरी आणि कोकणी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. हे देखील वाचा- राखी सावंत ने बाथटब मध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर करत फॅन्सना दिली 'ही' खुशखबर

सुरेश वाडकर यांना 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर 2011 साली त्यांना मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढेच नव्हेतर मध्य प्रदेश सरकारनेही त्यांना प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्काराने गौवरण्यात आले होते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change