Nadiyon Paar Song Released: Roohi चित्रपटातील ‘नदियों पार’ गाणं प्रदर्शित; पहा Janhvi Kapoor ची घायाळ करणारी अदा
Nadiyon Paar Song (PC - You Tube)

Nadiyon Paar Song Released: बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आणि राजकुमार राव यांचा लोकप्रिय चित्रपट 'रुही' (Roohi) सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याबरोबरचं आतापर्यंत दोन गाणीही रिलीज झाली आहेत. आता आज या चित्रपटाचे ‘नदियों पार’ गाणे रिलीज झाले आहे. 'नदियों पार' ही 2004 मध्ये रिलीज झालेल्या Shamur ग्रुपचे लेट्स द म्यूज़िक प्ले चे रिमेक व्हर्जन आहे. Chris Barbosa and Ed Chisolm यांनी हे गाणं लिहिलं होतं. या गाण्याचं हिंदी व्हर्जन सचिन-जिगर यांनी गायलं आहे.

नदियों पार हा एक सेंशुअस नृत्य आहे, ज्यात जाह्नवी कपूरने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यामध्ये जाह्नवी कपूरने ज्या प्रकारे नृत्य आणि मूव्स केल्या आहेत, त्या कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिल्या नसतील. सध्या इंटरनेटवर जान्हवीचं हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. (वाचा - Heropanti 2: टायगर श्रॉफने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; पहिल्या लूकसह सांगितली 'हीरोपंती 2'च्या प्रदर्शनाची तारीख)

जाह्नवी कपूर एक उत्तम डान्सर आहे. बऱ्याच इंस्टाग्राम व्हिडिओंमध्ये याचा पुरावादेखील आपण पाहिला असेल. जान्हवी आपले डान्स व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते. नदियो पार या गाण्यात जाह्नवी गोल्डन ड्रेसमध्ये खूप हॉट दिसत आहे.