Heropanti 2: टायगर श्रॉफने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; पहिल्या लूकसह सांगितली 'हीरोपंती 2'च्या प्रदर्शनाची तारीख
Heropanti 2 Poster (PC - Instagram)

Heropanti 2: बॉलीवूडचा अ‍ॅक्शन बॉय टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ने मंगळवारी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. टायगरने वाढदिवसाच्या दिवशी आपल्या चाहत्यांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. टायगरने आपला आगामी चित्रपट 'हीरोपंती 2' (Heropanti 2) चा फर्स्ट लूक आणि चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर केली आली. टायगरने सोशल मीडियावर 'हीरोपंती 2' चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. टायगरने या पोस्टला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, 'माझे पहिले प्रेम परत आले आहे. अशी कृती, साहस, जे तुम्ही यापूर्वी कधीचं पाहिलं नसेल. 3 डिसेंबरला थिएटरमध्ये येऊन सेलिब्रेशन करा.' ‘हीरोपंती 2’ चे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. खान यांनी यापूर्वी बागी 2 आणि बागी 3 चित्रपटाचे दिग्दर्शित केलं आहे.

‘हीरोपंती 2’ चित्रपटाची निर्माता साजिद नाडियाडवाला आहेत. टायगरसाठी हिरोपंती 2 चित्रपट खास आहे. कारण, टायगरने 2014 मध्ये हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये हीरोपंती 2 ची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात तारा सुतारिया टायगरसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हीरोपंती 2 चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू झाले आहे. (वाचा - Tiger Shroff Birthday: Disha Patani आणि Tiger Shroff च्या लग्नावर जॅकी श्रॉफने सोडलं मौन; केलं 'हे' महत्त्वाचं वक्तव्य)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

या व्यतिरिक्त टायगरच्या बागी 4 आणि गणपत पार्ट 1 ची ही घोषणा करण्यात आली. बागी 3 हा टायगरचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे. जो कोरोना व्हायरस महामारी सुरू होण्यापूर्वी 6 मार्च 2020 रोजी प्रदर्शित झाला होता. महामारीतील चित्रपटगृहे बंद झाल्याने टायगरच्या चित्रपटावर मोठा परिणाम झाला.