Tiger Shroff Birthday: Disha Patani आणि Tiger Shroff च्या लग्नावर जॅकी श्रॉफने सोडलं मौन; केलं 'हे' महत्त्वाचं वक्तव्य
टाइगर श्रॉफ आणि दिशा पटानी, जैकी श्रॉफ, (Photo Credits: Instagram)

Tiger Shroff Birthday: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. टायगर हा बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे, जो नेहमीचं त्याच्या शानदार नृत्यासाठी आणि चित्रपटांमधील जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. टायगरने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम नृत्य आणि अॅक्शनद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय टायगर श्रॉफ आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानीला डेट करण्यासाठी बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. दिशा आणि टायगर बर्‍याचदा एकत्र दिसतात. अशा परिस्थितीत हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत. तथापि, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीचं अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, टायगर श्रॉफच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे वडील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी टायगरच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. (वाचा - अभिनेत्री Kangana Ranaut च्या अडचणीमध्ये वाढ; कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी, जाणून घ्या सविस्तर)

इंग्रजी वेबसाइट हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जॅकी श्रॉफ यांनी 31 व्या वाढदिवशी टायगरच्या लग्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच एक उत्कृष्ट अभिनेता असल्याबद्दल टायगर श्रॉफचं कौतुक केले. जॅकी श्रॉफ मुलाच्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाले की, 'सध्या त्याने त्याच्या कामासोबत लग्न केलं आहे. मला वाटत नाही की, तो डिफोक करीत आहे. कारण एकदा त्याने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की, त्याच्याकडे फोकस सारखे लेसर असते. जर त्याने लग्न केले तर मला माहित आहे की, तो त्याकडेही लक्ष देईल. याशिवाय, जॅकी श्रॉफने असेही म्हटले आहे की, जेव्हा लोक त्याला टायगरचे वडील म्हणून ओळखतात, तेव्हा मला खूप आनंद होतो,' असंही जॅकी श्रॉफ यांनी म्हटलं आहे.

टायगर श्रॉफने हीरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात मुख्य भूमिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री कृती सेनन देखील दिसली होती. टायगर आणि क्रितीने आपल्या डेब्यू चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. बॉक्स ऑफिसवर हिरोपंती चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर टायगर श्रॉफ श्रद्धा कपूरसोबत चित्रपटाच्या पडद्यावर दिसला होता.

यानंतर टायगर श्रॉफने ए फ्लाइंग जट्ट, बागी 3, स्टूडेंट ऑफ द ईयर 2 आणि वॉर चित्रपटात दिसला होता. वॉर हा टायगर श्रॉफच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट आहे. या चित्रपटात तो अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसला होता.