Film critic Rajeev Masand arrives at Bandra police station । Photo Credits: Twitter/ ANI

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद पुन्हा चर्चेमध्ये आहे. 14 जूनला राहत्या घरी सुशांतने गळफास घेत त्याचं जीवन संपल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, प्रोडक्शन हाऊस, कास्टिंग डिरेक्टर नंतर आज सिने समीक्षक, पत्रकार राजीव मसंद (Rajeev Masan) यांची देखील पोलिस चौकशी सुरू आहे. आज (21 जुलै) काही वेळापूर्वी राजीव मसंद वांद्रे पोलिस ठाण्यात (Bandra Police Station) दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर सुशांत सिंह राजपूत यांच्या सिनेमांना खराब रेटिंग दिल्याचा आरोप आहे. Suicide or Murder सिनेमात सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार प्रमुख भूमिका (Check First Look)

सुशांत सिंह राजपूत मागील काही महिन्यांपासून नैराश्यामध्ये होता. मात्र आर्थिक चणचण नव्हती, उत्तर फिल्म करियर असताना सुशांतने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. दरम्यान सध्या पोलिस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.

राजीव मसंद हे काही कलाकारांच्या सिनेमांना मुद्दामून खराब रेटिंग्स देतात असा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत कंगना रणावतसह काही कलाकार मंडळींनीदेखील आपली मतं व्यक्त करत राजीव मसंद यांच्यावर टीका केली होती.

ANI Tweet

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सह अनेक कलाकारांचे जबाब नोंदवले आहेत. संजय लीला भंसाळी, आदित्य चोप्रा अशा बड्या हस्तींचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान रिया चक्रबर्ती कडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोशल मीडियातून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.