Suicide or Murder सिनेमात सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार प्रमुख भूमिका (Check First Look)
Suicide Or Murder Poster (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) याच्या आत्महत्येच्या महिन्याभरानंतर अजूनही सर्वत्र चर्चा सुरु आहेत, त्याच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय. यासंदर्भात सीबीआय (CBI) कडून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा होत आहे,याच पार्श्वभूमीवर निर्माता विजय शेखर गुप्ता (Vijay Shekhar Gupta) यांचा 'Suicide or Murder' हा सिनेमा सुद्धा चर्चेत आहे. सुशांतच्या आयुष्यावर बनणाऱ्या या सिनेमासाठी सुशांत सारखाच दिसणाऱ्या टिकटॉक स्टार सचिन तिवारी (Sachin Tiwari) याची निवड करण्यात आली आहे. अलीकडे विजय शेखर गुप्ता यांच्याकडून सिनेमाचे पोस्टर सुद्धा इंस्टाग्राम वर रिलीज करण्यात आले. इंडस्ट्रीच्या बाहेरून आलेल्या एका कलाकारांची कहाणी मांडण्यासाठी आता एका Outsider ची निवड करण्यात आली आहे असेही गुप्ता यांनी म्हंटले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्म्याशी बोलल्याचा हफ पॅरानॉर्मल च्या स्टीव हफ यांचा दावा

विजय शेखर गुप्ता यांनी ही सचिन तिवारी याच्या सोबत हा सिनेमा करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सचिनचे जुने व्हिडीओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह राजपूत हिने भावाच्या आठवणीत शेअर केला भावूक व्हिडिओ (Watch Video)

 

'Suicide or Murder' पोस्टर

सचिन तिवारी पोस्ट

 

View this post on Instagram

 

Today I am very sad.....????

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin) on

विजय गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे "या सिनेमाद्वारे बॉलिवूडला पूर्णपणे एक्सपोज करणार आहे. बाहेरुन अनेक मुले कामाच्या शोधात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात. मात्र खूप कमी लोकांना यात यश मिळते. कारण येथे बॉलिवूड गँगचे राज्य आहे. हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासाने प्रेरित झालेला सिनेमा असेल. यामुळे सिनेसृष्टीचे खरे रुप लोकांसमोर येईल.

दरम्यान, सुशांतच्या घरी तपास करत असताना मुंबई पोलिसांच्या हाती पाच डायरीज लागल्या होत्या यातून त्याच्या विषयी आणखीन कोणती माहिती समोर येणार हे सिनेमात पाहायला मिळू शकते. सिनेमाचे शूटिंग कधी होणार आणि प्रदर्शनाचे तारीख काय असणार याचे अपडेट्स सुद्धा लवकरच कळवले जातील.