सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह राजपूत हिने भावाच्या आठवणीत शेअर केला भावूक व्हिडिओ (Watch Video)
Shweta Singh Kirti & Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येचे दुःख कुटुंबिय अजूनही पचवू शकलेले नाहीत. सुशांतची एक्सिट मनाला चटका लावणारी होती. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान सुशांत याची बहिण श्वेता सिंह कीर्ति (Shweta Singh Kirti) हिने भावाच्या आठवणीत एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सुशांत त्याला आवडणाऱ्या गोष्टी करताना दिसत आहे. या व्हिडिओत सुशांत गिटार वाजवताना, गेम खेळताना, टीव्ही बघताना, डान्स करताना दिसत आहे. (सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'च्या OTT प्लॅटफॉर्मवरील रिलीजमुळे कुटुंबिय नाराज? पाहा काय म्हणाला सुशांतचा भाऊ)

श्वेताने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या भावासाठी खास संदेश लिहिला आहे. पोस्टमध्ये श्वेताने लिहिले, "एक दुःख जे इतके किंमती आहे की ज्यासाठी जगातील कोणतीच गोष्ट नको. आणि या दुःखाने झालेली जखम इतकी खोल आहे की तुम्ही ती कोणाही सोबत शेअर करु शकणार नाही, इच्छित नाही. माय फॉरएव्हर स्टार." (सुशांत सिंह राजपूत याच्या नावे ओळखला जाणार बिहारच्या पूर्णिया मधील रस्ता आणि चौक; पहा Photos)

Shweta Singh Kirti Post:

सुशांतने अचानक घेतलेल्या एक्सिटनंतर श्वेता त्याच्या आठवणीत सातत्याने पोस्ट करत आहे. ती आपल्या पोस्टमधून भावाबद्दलच्या भावना व्यक्त करते. तसंच सुशांतच्या निधनानंतर त्याच्या वस्तू आठवणीत जतन करण्यात येणार आहे. तसंच सुशांतच्या आठवणीत एक सामाजिक संस्था देखील निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बिहार मधील पूर्णिया या सुशांतच्या मूळ गावातील रस्त्याला आणि चौकाला देखील सुशांतचे नाव देण्यात आले आहे.