Vivek Oberoi starrer PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter)

PM Narendra Modi Movie: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) दरम्यान प्रदर्शित होऊ पाहणारा परंतू अचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने पदर्शन टळलेला 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाला अखेर प्रदर्शनाची तारीख मिळाली आहे. येत्या 24 एप्रिल रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मुळात हा चित्रपट 5 एप्रिल रोजीच प्रदर्शित होणार होता. परंतू, लोकसभा निवडणूक सुरु असल्याने विरोधकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांचा बालपण ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आल्याचे सांगितले जात होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा या चित्रपटावर आक्षेप होता. प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच १९ मेपर्यंत प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले. (हेही वाचा, PM Narendra Modi Song : पीएम नरेंद्र मोदी चित्रपटातील देशभक्तीने भारलेले गीत प्रदर्शित (पहा व्हिडीओ))

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध या चित्रपटाच्या निर्मात्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवत निर्मात्यांना दिलासा दिला नाही. त्यानंतर स्वत: निर्मात्यांनीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट येत्या 24 मे रोजी प्रदर्शीत होणार आहे.