Bigg Boss Season 16 Winner: MC Stan उर्फ अल्ताफ तडवी ठरला बिग बॉस सीझन 16 चा महाविजेता
MC-Stan-Wins-Bigg-Boss-16

Shiv Thakare Bigg Boss Season 16 Winner: एमसी स्टॅन (MC Stan aka Altaf Tadavi) हा यंदाचा बिग बॉस विजेता ठरला आहे. फिनाले कार्यक्रमात अभिनेता सलमान खान याच्याद्वारे ही घोषणा करण्यात आली. एमसी स्टॅन याच्याखालोखाल अनुक्रमे शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. बिग बॉस सीझन 16 चा फिनाले (Bigg Boss Season 16 Finale) 12 फेब्रुवारी रोजी पार पडला.  दरम्यान, प्रियांका चहर चौधरी, शालिन भानोत (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन (MC Stan aka Altaf Tadavi) हे या पर्वाचे टॉप फाईव्ह (Bigg Boss Finalist Top 5) राहिले.

फिनाले सुरु झाल्यानंतर काही वेळातच शालिन भानोत पाचव्या तर अर्जना गौतम चौथ्या स्थानावर घरातून बाहेर पडले. त्यामुळे अंतिम विजेत्यासह पहिल्या तिन क्रमांकामध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियंका चहल चौधरी हे राहिले. या तिघांमध्ये जोरदार टक्कर झाली. मात्र, शेवटच्या क्षणी प्रियांका चहर चौधरी हिस बाहेर पडावे लागल्याने अंतिम सामना शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांमध्ये झाला. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोघे बिघबॉसच्या घरातील दिवे मालवून घराबाहेर आले. घराबाहेर येताच काऊंटडाऊन सुरु झाले आणि अभिनेता सलमान खान याने हात उंचावत   एमसी स्टॅन  याला बिग बॉस 16 च्या पर्वाचा महाविजेता घोषीत केला. (हेही वाचा, Shiv Thakare vs Archana Fight Video: बिग बॉस 16 च्या घरातून बाहेर काढल्यानंतर अर्चना गौतमला आला राग, म्हणाली - माझ्याविरोधात केल षडयंत्र (Watch Video))

बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये होस्ट आणि अभिनेता सलमान खान याने तडाखेबंद निवेदन केले. त्याच्या जोडीला भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांनी आपल्या विनोदी अभिनयाने संपूर्ण कार्यक्रमालाच बहार आणली.

ट्विट

'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील 'नैयो लडगा' गाणे रिलीज

दरम्यान, बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये अभिनेता सलमान खान याच्या बहुप्रतिक्षित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले. हिमेश रेशमिया याचे संगित असलेले हे गाणे सलमान आणि पुजा हेगडे (Pooja Hegde) यांच्यावर चित्रीत करण्या आले आहे. सलमान खान आणि पुजा हेगडे यांची ऑन स्क्रिन जोडी दोघांच्याही चाहत्यांना प्रथमच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.