Kriti Kharbanda-Pulkit Samrat Wedding: बॉलिवूड अभिनेती रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यानंतर आता बी-टाऊनचे कपल क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांनीही लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी 16 मार्च रोजी दिल्लीजवळील मानेसरमध्ये एकमेकांसोबत सप्तपदीची वचन पूर्ण केली. आता नवविवाहित जोडप्याचे लग्नाचे फोटो आले आहेत. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. दोघेही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आज या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन घेतले आहे.
क्रिती आणि पुलकित यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल -
पुलकितसोबत लग्न केल्यानंतर क्रिती खरबंदाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. वरळानंतर एकमेकांचा हात धरून हसण्यापासून, पुलकितच्या कपाळावर क्रितीने चुंबन घेण्यापर्यंतचे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. (हेही वाचा - Kriti Kharbanda and Pulkit Samrat Wedding Update: क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटचे 15 मार्चला गुरुग्राममध्ये होणार लग्न)
पहा फोटोज -
View this post on Instagram
लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर क्रिती खरबंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, खोल निळ्या आकाशापासून सकाळच्या दवापर्यंत, चढ-उतारांमधून, फक्त तूच आहेस. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, प्रत्येक वेळी आणि नंतर, जेव्हा माझे हृदयाचे ठोके वेगळ्या पद्धतीने होतात. तेथे तूच असायला हवे. सतत, तू.
क्रिती आणि पुलकितचा वेडिंग लूक -
क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी त्यांच्या लग्नात एक अनोखा लुक केला होता. अभिनेत्री गुलाबी रंगात राजकुमारीसारखी दिसत होती, तर वराने हिरव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. क्रिती खरंबडा हिने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हिऱ्यांच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा लूक खूपचं क्यूट दिसत होता. पुलकितने आपल्या ग्रूम लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती, ज्यावर गायत्री मंत्र लिहिलेला होता.