Google Most Searched Asian 2022: गुगलने सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 आशियाईंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लता मंगेशकर पाचव्या क्रमांकावर आहेत. कतरिना कैफ (Katrina Kaif), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अनुक्रमे सात, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. तर भारतीय क्रिकेटर विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे.
कोरियन बँड बीटीएस फाइव्ह गुगल मोस्ट सर्च एशियनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या बँडचे चाहते जगभरात असून त्यांची गाणी सर्वांनाच आवडतात. दुसऱ्या क्रमांकावर जंगकूक आहे. जिमीन चौथ्या क्रमांकावर तर लिसा सहाव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - Most Searched Celebs List 2022: हॉलीवूड अभिनेत्री Amber Heard ठरली गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली सेलिब्रिटी; Queen Elizabeth II आणि Elon Musk यांनाही स्थान)
View this post on Instagram
दरम्यान, गुगलने 2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या आशियाईंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सारा अली खान, दिशा पटनी, जान्हवी कपूर यांसारख्या अभिनेत्रींचेही नाव आहे, पण कॅटरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा या भारतीय अभिनेत्री टॉप टेनमध्ये आहेत. आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नुकतीच ती एका मुलीची आईही झाली आहे. त्याच वर्षी तिने रणबीर कपूरसोबत लग्नही केले आहे. ती लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय रणवीर सिंग महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
तथापी, आलिया भट्टही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कतरिना कैफ पुढील काळात सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. तर प्रियांका चोप्रा लव्ह अगेनमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ती सिटाडेल या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याआधी, गुगलने 2022 शी संबंधित अनेक चित्रपट आणि वेब सीरिजची यादीही जारी केली होती.