Most Searched Celebs List 2022: हॉलीवूड अभिनेत्री Amber Heard ठरली गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली सेलिब्रिटी; Queen Elizabeth II आणि Elon Musk यांनाही स्थान
Johnny Depp and Amber Heard (Photo Credit Instagram)

यंदा म्हणजेच, 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या (Most Searched Celebrity On Google In 2022) यादीत अंबर हर्ड (Amber Heard) पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, अंबर हर्डचा माजी पती जॉनी डेपने दरमहा 5.5 दशलक्ष सर्चसह या यादीत दुसरे स्थान पटकावले. याच वर्षी या दोघांचा घटस्फोट झाला. यादीमध्ये तिसरे स्थान दिवंगत ब्रिटीश राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आहे, ज्यांचे या वर्षी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.

यावर्षी अनेक सेलिब्रिटी चर्चेत होते. यामध्ये आपल्या घटस्फोटामुळे सर्वात उल्लेखनीय ठरले ते अंबर हर्ड आणि जॉनी डेप. हर्डने 2018 च्या वॉशिंग्टन पोस्ट स्तंभात डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर या दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरु झाली, जिथे अखेरीस जॉनी डेपने युद्ध जिंकले. म्हणूनच CelebTattler नुसार यावर्षी, 36 वर्षीय हर्ड दरमहा सरासरी 5.6 दशलक्ष सर्चसह गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल राहिली.

वेबसाइटने 2022 मध्ये Google शोध ट्रेंडमधील डेटा पॉइंट्सचे विश्लेषण केले आणि 150 हून अधिक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मागोवा घेतला. अंबर हर्डचा माजी पती जॉनी डेपने दरमहा 5.5 दशलक्ष सर्चसह यादीत दुसरे स्थान पटकावले. दरमहा 4.3 दशलक्ष गुगल सर्चसह दिवंगत ब्रिटीश राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे तिसरे स्थान आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू टॉम ब्रॅडीने दरमहा 4.06 दशलक्ष सर्चसह चौथे स्थान पटकावले. (हेही वाचा: हॉलिवूडमध्ये चमकणार जॅकलिन फर्नांडिसचे नशीब! डेब्यू चित्रपटाचे शेअर केले पोस्टर)

किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन अनुक्रमे 3.4 दशलक्ष आणि 3.2 दशलक्ष सरासरी सर्चसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. एलोन मस्क यांना सरासरी 3.19 दशलक्ष मासिक सर्चसह सातवे स्थान मिळाले आहे.