अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हॉलिवूडचा मार्ग स्वीकारला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) या मार्गावर निघाली आहे. जॅकलिनने अलीकडेच तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे 'टेल इट लाइक अ वुमन' (Tell it like a Woman). जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे. त्यामुळेच तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. 'टेल इट लाईक अ वुमन' या चित्रपटाचे दिग्दर्शन एक नव्हे तर आठ महिला चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. पोस्टर शेअर करताना जॅकलीनने लिहिले की, या प्रोजेक्टचा भाग असल्याचा तिला अभिमान आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)