बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने काल तिचा 45 वा वाढदिवस होता. लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत करिश्माने आपला बर्थडे सेलिब्रेट केला. करिश्मा कपूरने सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत ती करीना कपूर, आई बबिता कपूर यांच्या सोबत दिसत आहे. त्याचबरोबर तिने एक हॉट फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत ती ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसत आहे.
करिश्मा कपूर हिने हा फोटो शेअर करत लिहिले की, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःवर प्रेम करा. आज मी बर्थडे मूडमध्ये आहे. करिश्माच्या या फोटोला 2.5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांना नक्कीच घायाळ करेल.
पहा फोटो:
गेल्या काही वर्षांपासून सिनेमांपासून दूर असलेल्या करिश्मा कपूर हिने 2012 मध्ये आलेल्या डेंजरस इश्क या सिनेमात काम केले होते. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या झिरो सिनेमात तिची झलक पाहायला मिळाली. लवकरच करीश्मा कपूर ऑल्ट बालाजी वेब सिरीज मेंटलहुड मध्ये झळकेल. या शो बद्दल करीश्माने सांगितले की, हा संपूर्ण शो मातृत्व वर आधारीत असून आईच्या आयुष्यातील अनेक चढउतार आणि भावना दाखवण्यात आल्या आहेत.