करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर पुन्हा होणार बाबा !
करिश्मा कपूरचा एक्स हजबँड (Photo Credit : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स पतीबद्दलची एक खास गोष्ट समोर आली आहे. संजय आणि करिश्मा यांनी दोन वर्षांपूर्वी आपले 13 वर्षांचे वैवाहीक नाते संपुष्टात आणले. यानंतर गेल्यावर्षी संजय कपूरने गर्लफ्रेंड प्रिया सचदेवशी विवाह केला. आता प्रिया सचदेव प्रेग्नेंट असून लवकरच संजय कपूरच्या घरी पाळणा हलणार आहे. काही दिवसांपूर्वीच संजय-प्रियाने लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला.

संजय कपूर 52 वर्षांचा असून त्याचे हे तिसरे अपत्य असणार आहे. संजय कपूर आणि करिश्मा कपूरला समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरकडे आहे. संजय कपूर अनेकदा दोन्ही मुलांसोबत वेळ घालवत असतो. करिश्मा कपूरशी लग्न करण्यापूर्वी संजयने डिझाईनर नंदिता महतनीसोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर 2003 मध्ये दोघेही वेगळे झाले.

तर 42 वर्षीय प्रिया सचदेव दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रियाने संजयशी लग्न करण्यापूर्वी विक्रम चटवालसोबत विवाह केला होता. विक्रम आणि प्रियाला एक मुलगी आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रिया 7 महिन्यांची प्रेग्नेंट असून डिसेंबरमध्ये ती बाळाला जन्म देईल.

करिश्मा कपूरचे नाव सध्या बिजनेसमॅन संदीप तोशनीवालसोबत जोडले गेले आहे. संदीप तोशनीवाल याचा ही गेल्याच वर्षी घटस्फोट झाला आहे. त्यानंतर आता करिश्मा-संदीप विवाहबद्ध होतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.