Indian Army and Akshay Kumar (Photo Credits: Twitter)

आज (26 जुलै) देशभरात कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा करण्यात येत आहे. तर भारत-पाकिस्तान  (India-Pakistan War 1999)  या दोन देशात झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यामध्ये काही जवान अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'केसरी' (Kesari) चित्रपटातील देशभक्तीपर गीत गाताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचसोबत जवांनाचे शौर्य आणि बलिदानाला आजच्या कारगिल दिवसानिमित्त सलाम करत आहेत. तर अक्षय कुमारने हा व्हिडिओ त्याच्या ट्वीटवर पोस्ट करत असे म्हटले आहे की, हा व्हिडिओ हृदयस्पर्शी असून तुम्ही दिलेला सन्मान त्या वीरांना सलाम करतो ज्यांच्यासाठी खरा बनवण्यात आला आहे.(Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं)

या व्हिडिओ बद्दल अक्षयने आपल्या भावना व्यक्त करत जवानांच्या कार्याला सलाम केला आहे. केसरी सिनेमाची कथा ही सुद्धा देशभक्त वीरांच्या शौर्यागाथा यामधून दाखवते. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच आता गुड न्यूज या चित्रपटातून झळकणार आहे. तसेच 'मिशन मंगल', 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'हाउसफुल्ल 4' मधून सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.