What Woman Want Trailer: करिना कपूर उलगडणार तिच्या मनातील गुपित
करिना कपूर (फोटो सौजन्य- ट्विटर)

सध्या टेलिव्हिजन किंवा रेडिओवर नव नवीन शो सुरु झाले आहेत. त्यामुळे करण जोहर, नेहा धुपिया यांच्या रेडिओ शो ला टक्कर देण्यासाठी लवकरच करिनासुद्धा रेडिओ जॉकीची भूमिका साकारणार आहे. तर हा चॅट शो येत्या 10 डिसेंबर पासून सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

What Women Want या नव्या रेडिओ शोच्या माध्यमातून अभिनेत्री करिना कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच अनेक सहकलाकारांसह बॉलिवूडमधील इतर अभिनेत्री ही या शोमध्ये दिसणार आहेत. तसेच अमृता अरोरा ते सनी लिओनी या शोमध्ये झळकणार असल्याचे सांगितले जात आहे.

करिना या कार्यक्रमाच्या मदतीने एक महिला म्हणून या सर्व कलाकारांना काय वाटते याबद्दल जाणून घेणार आहे. तसेच त्यांच्या मनातील गोष्टी आणि भावविश्व उलगडण्यास सांगणार आहे. मात्र इश्क 104.8 AF या वाहिनीसाठी करिना हा चॅट शो करणार आहे.