Kareena Kapoor ने विकेंड चा फॅमिली फोटो शेअर करत पहिल्यांदाच पोस्ट केली तिच्या चिमुकल्या नवाबाची झलक; पहा फोटो
Kareena Kapoor's New Born| Photo Credits: Instagram

करिना कपूरच्या (Kareena Kapoor) घरी काही महिन्यांपूर्वीच एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. त्याचा फोटो रणधीर कपूर यांच्याकडून चुकून शेअर झाल्यानंतर वायरल झाला होता. पण आज करिना कपूरने इंस्टाग्रामवर खास फॅमिली फोटो शेअर करत तिच्या धाकट्या लेकासोबत तैमुर (Taimur) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमध्ये करिनाने तिच्या नवजात मुलाचा चेहरा जाणीवपूर्वक लपवला आहे.

करिनाने फोटो तर शेअर केला आहे पण इतक्यात तिला लेकाचा चेहरा दाखवायचा नसल्याने तिने शिताफीने त्याच्या चेहर्‍यावर बाळाच्या चेहर्‍याचा इमोजी लावत फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान या फोटोमध्ये बाळाचा मोठा भाऊ तैमुर आणि बाबा सैफ अली खान त्याच्या निरागसतेकडे मोठ्या कुतुहलाने पाहताना दिसत आहेत. करिनाने हा फोटो शेअर करताना, 'माझा विकेंड असा दिसतोय, तुमचं काय आहे'? असं कॅप्शन दिले आहे. Kareena Kapoor आणि Saif Ali Khan च्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा क्यूट फोटो.

करिना कपूरची पोस्ट

 

8 मार्च जागतिक महिला दिनी देखील करिनाने तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र तेव्हा देखील करिनाने बाळाचा चेहरा कॅमेर्‍यासमोर आणणं टाळलं होतं.

करिना कपूर आणि सैफच्या दुसर्‍या बाळाचा जन्म 21 फेब्रुवारी दिवशी झाला होता. दरम्यान तैमुरच्या जन्माच्या नंतर त्याचे फोटो झपाट्याने सोशल मीडियात वायरल झाले होते. तैमुरची झलक पाहण्यासाठी अनेक नेटकरी उत्सुक असतात. त्याचे खास फॅन पेजेस देखील आहेत. पण आता दुसर्‍या मुलाच्या बाबतीत मात्र सैफिना थोडी खबरदारी घेत आहे. अद्याप त्यांच्याकडून बाळाचे नाव किंवा फोटो याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. करिनाच्या चाहत्यांमध्ये तिच्या दुसर्‍या लेकाचे फोटो पाहण्याबाबत कमालीची आतुरता आहे.