Kareena Kapoor आणि Saif Ali Khan च्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा क्यूट फोटो
तैमूर अली खान आणि त्याचा छोटा भाऊ (Photo Credits: Instagram)

अलीकडेचं करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) च्या घरात आणखी एका मुलाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मामुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 21 फेब्रुवारी रोजी करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर चाहते करीना आणि सैफच्या दुसर्‍या मुलाची झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र, सैफ आणि करीना या मुलाला माध्यमांच्या चर्चेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. असं असूनही त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचे श्रेय या मुलाचे आजोबा रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना जाते. ज्यांनी चुकून इंटरनेटवर आपल्या नातवाचा फोटो शेअर केले.

रणधीर कपूरने इंस्टाग्रामवर दोन मुलांचा फोटो शेअर केला होता. त्यात एका बाजूला तैमुर दिसला होता तर दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ. या फोटोत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला तैमूरचा धाकटा भाऊ खूपचं गोंडस दिसत होता. या फोटोमध्ये या मुलाचा चेहरा बऱ्यापैकी तैमूरसारखा दिसत आहे. (वाचा - Kangana Ranaut ने थिएटर बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा; म्हणाली, व्हायरस नाही, व्यवसाय बंद होईल)

तैमूर अली खान आणि त्याचा छोटा भाऊ (Photo Credits: Instagram)

सैफ आणि करीनाने या मुलाचे नाव उघड केले नाही किंवा त्यांचे फोटो सोशल मीडियावर लोकांशी शेअर केले नाहीत. परंतु, नाना रणधीर कपूर यांनी अनवधानाने हा फोटो इंटरनेटवर पोस्ट केला. मात्र, रणधीर कपूर यांनी काहीवेळातचं हा फोटो हटविला. परंतु, तोपर्यंत हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.