Kangana Ranaut ने थिएटर बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा; म्हणाली, व्हायरस नाही, व्यवसाय बंद होईल
Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करत आंशिक लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे सिनेमागृहांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्यामुळे थिएटर्स संचालकांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासमवेत आभासी बैठक घेतली. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाने ट्विटर करत म्हटलं आहे, या बैठकीनंतर त्याने संपूर्ण महिना थिएटर बंद केले. ही लज्जास्पद गोष्ट आहे. जगातील सर्वोत्तम सीएम व्हायरस पसरवण्याची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण आठवड्याभर लॉकडाउन का नाही केलं जात? या आंशिक लॉकडाउनमुळे व्हायरस थांबणार नाही. केवळ व्यवसाय बंद होतील.

या बैठकीत सिनेमागृह संचालकांनी राज्य सरकारकडे या व्यवसायाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. प्रदर्शक अक्षय राठी यांच्यानुसार, मल्टिप्लेक्स चालकांनी मालमत्ता करात तीन वर्षांची सवलत, एक वर्षासाठी वीज बिलात सूट, 5 वर्षासाठी परवान्याचे स्वयंचलित नूतनीकरण आणि 3 महिन्यांसाठी थिएट्रिकल रिलीजचा लाभ देण्याची मागणी केली. (वाचा - Bhumi Pednekar Tested COVID-19 Positive: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा नंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

महाराष्ट्रातील थिएटर बंद झाल्याने याचा सर्वाधिक परिणाम हिंदी चित्रपटांवर होणार आहे. कारण बॉक्स ऑफिस कलेक्शनचा बराचसा भाग मुंबई प्रदेशातून मिळतो. राज्य सरकारच्या आंशिक लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, 23 एप्रिल रोजी कंगनाचा चित्रपट 'थलाईवी' सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारची सूर्यवंशीही 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. आता बदललेल्या परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.