कंगना विरुद्ध बॉलिवूड (Kangana Vs Bollywood) हा वाद तसा जुनाच आहे, पण अलिकडे कंंगनाने अगदीच बोल्डपणे बोलायला किंबहुना टीका करायला सुरुवात केल्यापासुन तिच्या समर्थनात असलेले कलाकार सुद्धा विरोधक झाले आहेत. यामुळेच अलिकडे रोज कंंगना विरुद्ध एक कोणताही कलाकार असं वॉर सुरु होतंं अर्थात त्यांंची रणभुमी असते सोशल मीडिया. आज सुद्धा कंंगनाच्या एका ट्विट वरुन अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) तिला चीन शी लढण्याचा सल्ला वजा टोमणा मारला होता, ज्यावर उत्तर देताना कंंगनाने पार अनुराग ला मंंदबुद्धी म्हणत पलटवार केला आहे.काय आहे कंंगना विरुद्ध अनुराग असं ट्विट वॉर इथे पाहा. Urmila Matondkar vs Kangana: कंगना च्या Soft Pornstar कमेंटवर उर्मिला मातोंडकर यांना आधार देत प्रिया दत्त यांनी ट्विट केलं 'हे' गाणंं
कंंगनाने आज पहिल्या ट्विट मध्ये म्हंंटलंं होतं की," मी एक क्षत्रिय आहे,माझं शीर कापलं तरी झुकु देणार नाही आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आपला आवाज बुलंद असेल. मान, सन्मान आणि स्वाभिमानासोबत मी जगतेय आणि नेहमीच जगत राहीन, मी स्वतः माझ्या तत्त्वांसोबत तडजोड करत नाही कोणाला करुही देणार नाही." याच ट्विट वर उत्तर देत अनुराग ने कंंगनाला, "तु एकटीच आहेस! मणिकर्णिका! तु एक काम कर चार पाच जणांंना घेऊन चीन वर हल्ला कर आणि त्यांंना दाखवुन दे तु आहेस तोवर देशाचं कोणीकाही वाकडंं करु शकणार नाही, तसंही तुझ्या घरापासुन 1 दिवसाचं अंतर आहे त्यामुळे जा आणि दाखवुन दे शेरनी जा! जय हिंंद!" असे म्हंंटले आहे.
अनुराग कश्यप ट्विट
बस एक तू ही है बहन - इकलौती मणिकर्णिका । तू ना चार पाँच को ले के चढ़ जा चीन पे।देखो कितना अंदर तक घुस आए हैं । दिखा दे उनको भी कि जब तक तू है इस देश का कोई बाल भी बाँका नहीं कर सकता। तेरे घर से एक दिन का सफ़र है बस LAC का । जा शेरनी। जय हिंद । https://t.co/PZA6EFSKQj
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 17, 2020
तर आता अनुराग च्या या ट्विट ला उत्तर देत कंंगनाने ठीक आहे मी बॉर्डर वर जाते आणि तुम्ही ऑल्म्पिक मध्ये जा कारण देशाला गोल्ड मेडल हवेच आहेत. ही कोणती B Grade मूव्ही नाहीये, जिथे कलाकार काहीही बनतात जरा उपमा दिलेले समजत जा, तुम्ही इतके मंंदबुद्धी कधी झालात जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तर हुशार होतात असं म्हंंटलंं आहे. Kangana Ranaut Voted For Shiv Sena?
कंंगना रनौत ट्विट
ठीक है मैं बॉर्डर पे जाती हूँ आप अगले अलिम्पिक्स में चले जाना, देश को गोल्ड मडेलस चाहिए हा हा हा यह सब कोई बी ग्रेड फ़िल्म नहीं है जहां कलाकार कुछ भी बन जाता है, आप तो मेटफ़ॉर्ज़ को लिटरली लेने लगे, इतने मंदबुद्धि कबसे हो गए, जब हमारी दोस्ती थी तब तो काफ़ी चतुर थे🙂 https://t.co/TZVAQeXJ43
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 17, 2020
दरम्यान, सध्या कंंगना विरुद्ध उर्मिला मातोंंडकर हा वाद चर्चेत आहे. कंंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हंंटल्याने अक्खं बॉलिवूड कंंगनाच्या विरोधात उभं राहिलं आहे.