Urmila Matondkar vs Kangana: कंगना च्या Soft Pornstar कमेंटवर उर्मिला मातोंडकर यांना आधार देत प्रिया दत्त यांनी ट्विट केलं 'हे' गाणंं
Urmila Matondkar vs Kangana (Photo Credits: File Image)

Priya Dutt Supports Urmila Matondkar: बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री उर्मिला मातोंंडकर (Urmila Matondkar) यांंना Soft Pornstar असे म्हंंटले होते यानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकार, राजकारणी व चाहत्यांंनी उर्मिला यांंना पाठिंंबा देत ट्विट केले आहेत. याच पार्श्वभुमीवर संजय दत्त (Sanjay Dutt)  यांंची बहीण आणि कॉंग्रेस नेत्या प्रिया दत्त (Priya Dutt)  यांंनी सुद्धा एक खास ट्विट केले आहे. उर्मिला यांंना आधार देत प्रिया यांंनी कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें, कहीं बीत ना जाए रैना हे गाणं ट्विट करुन कंगना सारख्या कमेंंट करणार्‍यांंकडे लक्ष न देण्यास सांंगितले आहे. Kangana Ranaut vs Urmila Matondkar: कंगना रनौत हिच्या 'Soft Pornstar' कमेंटनंतर उर्मिला मातोंडकर हिच्या समर्थनार्थ बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विट

प्रिया दत्त यांंनी ट्विट मध्ये म्हंटले की, जेव्हा लोकांंना वाटतं की त्यांंना हरवता येणार नाही तेव्हा ती अगदी खालच्या पातळीवर उतरतात, मात्र जर का आपण कोण आहोत हे आपल्याला माहित असेल तर अशा लोकांंनी काहीही म्हंटलं तरी त्याचा फरक पडण्याची गरज नाही. यावेळी कंगनाची मुलाखत घेणार्‍या वाहिनीला सुद्धा टार्गेट करत त्यांंनी मीडिया सर्कस असं हॅशटॅग दिलं आहे.

प्रिया दत्त ट्विट

दरम्यान केवळ प्रिया च नव्हे तर दिग्दर्शक अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, हेमा मालिनी यांंनी सुद्धा उर्मिला यांंना पाठिंंबा दर्शवला आहे, तर उर्मिला यांंनी या प्रकरणात संंयमी भुमिका घेतली आहे. दुसरीकडे कंंगना ने आता पुन्हा आपल्यावर होणार्‍या आरोपांंवरुन उत्तर देत जेव्हा उर्मिला मला वेश्या म्हणाली तेव्हा तुम्ही फेमिनिझम चा प्रश्न का केला नाही असे विचारले आहे.