Kangna Ranaut (Photo Credits: Twitter @TeamKanganaRanautOfficial)

सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या मानहानी प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) समन्स बजावण्यात आला आहे. जावेद अख्तर यांनी 2020 मध्ये कंगना विरुद्ध गुन्हा दाखल करत मानहानीचा दावा केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स बजावण्यात आला असून उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी जुहू पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर टीव्ही मुलाखतीत बोलताना कंगनाने जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. अभिनेता हृतिक रोशनविरोधात काहीही बोलू नये यासाठी जावेद अख्तर यांनी दबाव आणल्याचे तिने मुलाखतीत म्हटले होते. या आरोपाविरोधात जावेद अख्तर यांनी  डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी कोर्टात मानहानीची दावा दाखल केला होता. तसंच विविध मुलाखतीतून माझ्यावर आरोप केले असून यामुळे माझी प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ANI Tweet:

दरम्यान, या प्रकरणातील चौकशी अहवाल सादर करण्यासाठी कार्टाने 17 जानेवारी रोजी पोलिसांना 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. (Kangana Ranaut Gets Rape Threats: हत्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा कंगना रनौत हिचा खुलासा, Watch Video)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य करताना कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटीज्झमचा मुद्दा ताणून धरला. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक कलाकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार यांच्यावर टीकेची मालिका सुरुच ठेवली.