Kangana Ranaut Gets Rape Threats: हत्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा कंगना रनौत हिचा खुलासा (Watch Video)
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त विधानं, बेधडक ट्विट यामुळे चर्चेत आहे. आता कंगना ने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने तिला बलात्कार आणि हत्येची धमकी मिळत असल्याचे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त विधानं, बेधडक ट्विट यामुळे चर्चेत आहे. आता कंगना ने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने तिला बलात्कार आणि हत्येची धमकी मिळत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत तिने अभिनेत्री दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्यावरही एक कटाक्ष टाकला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून इमोशनल आणि मेंटल ऑनलाईन लिचिंग सामना करावा लागत असल्याचेही तिने सांगितले. (Bollywood Drug Case: कंगना रनौत हिची ड्रग्स प्रकरणी चौकशी का झाली नाही? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल)
कंगना ने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, "गेल्या काही दिवसांपासून मला इमोशनल आणि मेंटल ऑनलाईन लिचिंगचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर हत्या आणि बलात्काराच्या धमक्या ही मिळाल्या आहेत. त्यामुळे आज मी देशाला काही प्रश्न विचारणार आहे. दरम्यान राजकारणातून प्रेरित झालेले, शेतकऱ्यांचे आंदोलन होते. त्यात दहशतवादी देखील सहभागी झाले होते. पण मी पंजाब मध्ये लहानाची मोठी झाले आहे. माझी शाळा तिकडची आहे. त्यामुळे मला माहिती आहे की, 99 टक्के पंजाबी लोकांना वेगळा देश नको आहे. त्यांचा संपूर्ण देश आहे. ते सर्व देशप्रेमी आहे. देश तोडणऱ्यांबद्दल मी काही बोलत नाही. पण जे सामान्य नागरिक आहेत ते त्यांच्या बोलण्यात का येतात? हा माझा प्रश्न आहे."
त्याचप्रमाणे पुढे ती म्हणाली की, "मला कायम माझ्या बोलण्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. एका देशभक्तासाठी हे खूप त्रासदायक आहे. मी देशाच्या हितासाठी बोलले तर मी राजकारण करते, असे म्हटले जाते. मग दिलजीत दोसांझ आणि प्रियंका चोप्रा यांना देखील प्रश्न विचारा की ते नेमकं काय करतात? त्यांना का कोणी प्रश्न विचारत नाही?"
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
कंगना रनौत 'थलाईवी' या मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपीकमध्ये झळकणार आहे. त्याचबरोबर 'थाकड़' या सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2020 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

