Kangana Ranaut चा बॉडीगार्ड Kumar Hegde ला अटक; महिलेची फसवणुकी केल्याचा होता आरोप
Kangna Ranaut (Photo Credits: Twitter @TeamKanganaRanautOfficial)

Kangana Ranaut's Bodygaurd Arrested by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला अटक करण्यात आली आहे. कुमारला कर्नाटकातील मांड्या येथून ताब्यात घेण्यात आले. महिलेच्या फसवणुकीच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईतील एका महिलेला दिलेले लग्नाचे वचन न पाळता धोका दिल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणाची माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, "मुंबई पोलिसांची एक टीम शनिवारी येथे पोहचली आणि कुमार हेगड़े ला मांड्या मधील हेग्गाडाहल्ली येथून अटक करण्यात आली." (हे ही वाचा: Kangana Ranaut Twitter Account Suspended: कंगना रनौत हिचे ट्विटर अकाऊंट निलंबीत, वादग्रस्त ट्विट करणे भोवले)

कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगड़ेवर मुंबई मधील एका ब्युटिशियनने धोका दिल्याचा आरोप केला आहे. मागील वर्षी जूनमध्ये लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर ते लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहू लागले. मात्र कुमारने लग्नाचे वचन मोडत धोका दिल्याचे तिने म्हटले आहे. पीडित महिला आणि कुमार एकमेकांना मागील 8 वर्षांपासून ओळखतात. कुमारने अनेक वेळा माझ्यासोबत जबरदस्ती केली असून 27 एप्रिल रोजी 50 हजार रुपये घेऊन तो फरार झाल्याचेही पीडितेने सांगितले. याप्रकरणी पीडित महिलेने डीएन नगर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर अखेर कुमारला अटक झाली आहे.

पीपिंग मूनच्या अहवालात पीडित महिलेने म्हटले आहे की, कुमारच्या आईने केस मागे घेण्यास दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आयपीसी कलम  376 (बलात्कार), 377 (अप्राकृतिक लैंगिक संबंध) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.