Kangana Ranaut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट निलंबीत (Kangana Ranaut Twitter Account Suspended) करण्यात आले आहे. अभिनेत्री कंगना रनौत ही सोशल मीडियावर नेहमी कार्यरत असते. देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरुन ती मतं व्यक्त करत असते. अनेकदा विविध विषयांवरुन व्यक्त केलेल्या मतांवरुन कंगना रनौत वादाच्या भोवऱ्यातही अडकते. दरम्यान, सध्या अशाच प्रकारची वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरुन तिचे ट्विटर अकाऊंट (Kangana Ranaut Twitter Account) निलंबीत करण्यात आले आहे. कंगना रनौत हिने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (Bengal Assembly Elections 2021) दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन आपले मत मांडत ट्विट केले होते. यात तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षावर गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर काही वेळातच कंगना रनौत हिचे ट्विटर अकाऊंट निलंबीत (Twitter Account Suspend) करण्यात आले आहे.

कंगना रनौत ट्विटर अथवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकदा भारतीय जनता पक्षाला पाठींबा देताना दिसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना ती नेहमीच पाठिंबा दर्शवते. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचार प्रकरणी कंगना रनौत हिने टीएमसीवर निशाणा साधत ट्विट केले होते. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, मी चुकीची होती. तो रावण नाही. तो सर्वात चांगला राजा होता. ज्याने जगातील सर्वात चांगला देश बनवला. महान व्यवस्थापक होता तो. विद्वान होता. आणि वीणा वाजवणार आणि आपल्या प्रजेचे रक्षण करणारा होता.ती तर खून की प्यासी राक्षसी 'ताडका' है. ज्या लोकांनी तिला मतदान केले. तुमचेही हात रक्ताने माखले आहेत. असे म्हणत तिने '#BengalViolence हा हॅशटॅग वापरला होता. (हेही वाचा, West Bengal Elections: कंगना रनौत विरोधात कोलकाता मध्ये तक्रार दाखल, मतमोजणीवेळी केले 'हे' ट्विट्स)

पुढे कंगनाने ट्विट करत म्हटले होते की, 'टीएमसीच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांवर बलात्कार केला आहे. इंदिरा गांधी यांनी 39 वेळा आणीबाणी लावली आणि त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्री मीडियाची भारताला पर्वा नाही की आपण काय विचार करतो. हे रक्ताचे भूकेलेल राष्ट्रप्रेम मोदींची भाषा ओळखत नाहीत. त्यांना डंडाच पाहिजे.'

Kangana Ranaut Twitte (File Image)

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार असे की, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी सत्तेत पुन्हा कायम राहील्या. त्यानंतर आता या राज्यातून हिंसाचाराच्या घटना पुढे येत आहेत. आरोप केला जात आहे की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला जात आहे. दरम्यान, या घटनांची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही.