Jacqueline Fernandez Adopts Villages: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील 'या' दोन गावांना घेतले दत्तक
Jacqueline Fernandez (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यता आला आहे. परिणामी, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे संकट वावरत असून अनेकांना आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागत आहेत. दरम्यान, अनेक राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू अशा लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत. महत्वाचे म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात स्थालंतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची सोय करणारा सोनू सूद अधिक चर्चेत आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही (Jacqueline Fernandez) गोर-गरिबांची मदत करण्याचा विडा उचलला आहे. जॅकलीनने आपल्या वाढदिवसानिमित्त 'अॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’ (Action Against Hunger Foundation) सोबत करार करून महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) आणि सकूर (Sakur) या दोन गावाला दत्तक घेतले आहे. तसेच या गावातील 1 हजार 500 लोकांची 3 वर्षांसाठी ती मदत करणार आहे.

“खूप आधीपासूनच हे माझ्या मनात होते. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांसाठी हे वर्ष फार त्रासदायक जात आहे. मी दत्तक घेतलेल्या या दोन गावांतील जवळपास 1 हजार 550 लोकांपर्यंत आम्ही मदत पोहोचवणार आहोत. इतकेच नव्हेतर गावातील महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत वैद्यकीय सहाय्य देण्यात येईल. कुपोषित मुलांची देखभाल करण्यात येईल. यासोबतच गावात किचन गार्डन बांधण्यात येईल. सर्व सुचनांचे पालन करून आणि सुरक्षेची काळजी घेऊन लोकांची मदत केली जाईल", असे जॅकलीन म्हणाली आहे. हे देखील वाचा- सोनू सूदने आपला शब्द पाळला; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु होणार पुण्यातील Warrior Aaji शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर

पाथर्डी आणि सकूर या गावातील लोकांवर कधीच उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी जॅकलिनने हे दोन्ही गाव दत्तक घेतल्याचे तिने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, जॅकलिनने कोरोना साथीच्या सुरूवातीस कुपोषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या फाउंडेशनसह कार्य केले आहे.