दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध होता. आपल्या सध्या, सरळ मात्र तितक्याचा ताकदीच्या अभिनयाच्या जोरावर त्याने अनेकांच्या मनात खास जागा बनवली होती. आता इरफानचा मोठा मुलगा बाबिल खान (Babil Khan) देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात करिअर करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, बाबिलला YRF च्या वेब सीरिजसाठी म्हणजेच यशराज फिल्म्ससाठी कास्ट करण्यात आले आहे, ज्यात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. Bollywood Hungama ने याबाबत वृत्त दिले आहे.
या वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे, दिग्गज एच, एस रावेल यांचा नातू आणि राहुल रावेलचा मुलगा शिव रावेल. शिव या सिरीजद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सिरीजचे नाव अद्याप ठरवण्यात आले नाही. सांगितले जात आहे की ही सिरीज 5 भागांची इन्वेस्टिगेशन थ्रिलर असेल, ज्यामध्ये अनेक ट्विस्ट असतील. या वेब सिरीजचे शुटींग नोव्हेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. भोपाळ येथे हे शुटींग पार पडेल.
सध्या अनेक मोठे बॅनर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उतरले आहेत, अशात वायआरएफ आतापर्यंत त्यापासून दूर होते, मात्र आता वायआरएफ एका वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करीत आहे. बाबिल खान स्टारर सिरीजव्यतिरिक्त, कंपनी अजून एका वेब सिरीजवरही काम करत आहे ज्याचे दिग्दर्शन मर्दानी 2 फेम गोपी पुथरण करणार आहेत. (हेही वाचा: दाक्षिणात्य अभिनेता Thalapathy Vijay ने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात दाखल केली तक्रार; जाणून घ्या काय आहे कारण)
अनुष्का शर्माची निर्मिती कंपनी 'क्लीन स्लेट फिल्म्स' च्या बॅनरखाली बनत असलेल्या 'काला' चित्रपटातही बाबिल खान काम करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि स्वस्तिक मुखर्जी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.